Skip to content
स्तोत्रसंहिता ४२:६-११

स्तोत्रसंहिता ४२:६-११

माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे; तेव्हा मी यार्देन प्रदेशातून आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून तुमचे स्मरण करणार.
तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे, सागर सागराला आव्हान करतो; तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ माझ्यावर झपाटून आदळत आहेत.
तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्‍या परमेश्वराची मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो.
मी आरोळी मारून म्हणतो, “हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक, तुम्ही मला का विसरलात? शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?”
१०
माझे शत्रू दिवसभर थट्टेने मला विचारतात, “तुझा परमेश्वर कुठे आहे?” यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.
११
हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options