Skip to content
स्तोत्रसंहिता ३९:१-६

स्तोत्रसंहिता ३९:१-६

संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथून याकरिता दावीदाचे स्तोत्र. मी स्वतःशी म्हणालो, “मी आपले आचरण जपणार आणि माझी जीभ पापापासून जपणार; अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील, तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन.”
म्हणून मी काही चांगलेही बोललो नाही, अगदी शांत राहिलो. पण माझा त्रास वाढतच गेला;
माझ्या अंतःकरणातील घालमेल अधिकच वाढत गेली, मी मनन करत असताना, माझ्या अंतःकरणातील अग्नी तप्त होत होता; तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो:
याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.
पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत. सेला
निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options