Skip to content
स्तोत्रसंहिता ३८:१५-२२

स्तोत्रसंहिता ३८:१५-२२

१५
याहवेह, मी माझी भिस्त तुमच्यावर ठेवली आहे; प्रभू माझ्या परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्या.
१६
कारण मी म्हटले, “माझे पाऊल घसरले, तेव्हा मजपुढे प्रौढी मिरविणार्‍यांना आनंद मिळू देऊ नका.”
१७
कारण मी कोसळण्याच्या बेतात आहे आणि माझे दुःख सतत मजबरोबर आहे.
१८
मी माझी पातके पदरी घेतो; माझ्या पापामुळे मी दुःखी आहे.
१९
अनेक लोक विनाकारण माझे शत्रू झाले आहेत; विनाकारण माझा द्वेष करणारे अनेक आहेत.
२०
माझ्या चांगुलपणाची फेड ते दुष्टाईने करीत आहेत आणि मी सत्याच्या बाजूने उभे राहिलो, तरीही ते माझा द्वेष करीत आहेत.
२१
याहवेह, मला सोडू नका; परमेश्वरा, मजपासून दूर जाऊ नका.
२२
माझे प्रभू, माझे तारणारे, लवकर या आणि त्वरेने मला साहाय्य करा.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options