Skip to content
स्तोत्रसंहिता २१:१-७

स्तोत्रसंहिता २१:१-७

संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या सामर्थ्यांमुळे राजा केवढा हर्ष पावतो. तुम्ही दिलेल्या विजयामुळे तो अत्यंत उल्लासतो!
कारण त्याचे मनोरथ तुम्ही पूर्ण केले आहेत; त्याने मागितलेली एकही गोष्ट तुम्ही अमान्य केली नाही. सेला
उत्कृष्ट आशीर्वादाने तुम्ही त्याचे स्वागत केले; तुम्ही त्याच्या मस्तकावर शुद्ध सोन्याचा राजमुकुट घातला.
त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले.
तुम्ही त्याला विजय आणि बहुमान दिला; तुम्ही त्याला ऐश्वर्य व वैभव दिले.
सर्वकाळचे सुख देऊन तुम्ही त्याला संपन्न केले आणि तुमच्या समक्षतेचा आनंद तुम्ही त्याला दिला.
कारण राजाचा भरवसा याहवेहवर आहे; सर्वोच्च परमेश्वराच्या अक्षय प्रीतीमुळे तो कधीही ढळणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options