मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १८:२०-३०

देव नीतिमानाचे समर्थन करतो

स्तोत्रसंहिता १८:२०-३०
२०
याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.
२१
कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.
२२
त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.
२३
मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.
२४
याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.
२५
विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता,
२६
शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.
२७
नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता.
२८
याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे; माझ्या परमेश्वराने माझ्या अंधाराचा प्रकाश केला आहे.
२९
तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.
३०
परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options