Skip to content
स्तोत्रसंहिता १७:६-९

देवाच्या संरक्षणावरील विश्वास

स्तोत्रसंहिता १७:६-९
६
मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका.
७
तुमचा आश्रय घेणार्‍यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.
८
तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;
९
मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options