स्तोत्रसंहिता १३६:१४-२६
१४
आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले, त्यांची करुणा सनातन आहे.
१५
परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले; त्यांची करुणा सनातन आहे.
१६
ज्यांनी आपल्या लोकांना अरण्यातून नेले, त्यांची करुणा सनातन आहे.
१७
ज्यांनी प्रबळ राजांचा नायनाट केला, त्यांची करुणा सनातन आहे.
१८
ज्यांनी प्रतापी राजांना ठार केले— त्यांची करुणा सनातन आहे.
१९
ज्यांनी अमोरी लोकांचा राजा सीहोन याला, त्यांची करुणा सनातन आहे.
२०
आणि बाशान प्रांताचा राजा ओग यालाही— त्यांची करुणा सनातन आहे.
२१
आणि त्यांची भूमी इस्राएलला कायमचे वतन म्हणून, त्यांची करुणा सनातन आहे.
२२
ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली, त्यांची करुणा सनातन आहे.
२३
ज्यांनी आमच्या पराकाष्ठेच्या दुबळेपणात आमची आठवण केली, त्यांची करुणा सनातन आहे.
२४
आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.
२५
ते सर्व प्राणिमात्राला अन्नपुरवठा करतात, त्यांची करुणा सनातन आहे.
२६
स्वर्गातील परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings