Skip to content
स्तोत्रसंहिता १३२:१-५

स्तोत्रसंहिता १३२:१-५

प्रवाशांचे आराधना गीत. हे याहवेह, दावीदाचे व त्याच्या स्वसुखत्यागाचे स्मरण करा.
त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला:
“मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन,
माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही, वा डुलकीही घेणार नाही,
जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options