मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ११९:६५-७२

टेथ: पीडेमुळे देवाचे नियम शिकणे

स्तोत्रसंहिता ११९:६५-७२
६५
हे याहवेह, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे, तुमच्या सेवकाचे कल्याण करा.
६६
तुम्ही मला ज्ञान व विवेक शिकवा, कारण तुमच्या आज्ञांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
६७
पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो.
६८
तुम्ही चांगले आहात आणि जे तुम्ही करता तेही भलेच असते; मला तुमचे विधिशिक्षण द्या.
६९
गर्विष्ठ लोकांनी माझ्याविरुद्ध कुभांडे रचली आहेत, परंतु तुमचे नियम मी संपूर्ण अंतःकरणाने पाळतो.
७०
त्यांची अंतःकरणे कठोर व संवेदनाहीन झाली आहेत, परंतु तुमच्या नियमशास्त्राने मी सुखावतो.
७१
मला मिळालेली पीडा माझ्या हिताची होती, जेणेकरून मी तुमचे नियम शिकावे;
७२
तुमच्या मुखातून निघालेले नियम, चांदी आणि सोने यांच्या हजारो नाण्यांपेक्षाही अधिक मोलाचे आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options