स्तोत्रसंहिता ११२:२-९
२
त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
३
संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील.
४
सात्विकासाठी अंधकारातही प्रकाश उदय पावतो; ते कृपावान, दयाळू व नीतिमान असतात.
५
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते, जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
६
निश्चितच, नीतिमान कधीही पथभ्रष्ट होणार नाही; त्यांना सर्वकाळ स्मरणात ठेवले जाईल.
७
वाईट बातमी त्यांना भयभीत करणार नाही; याहवेहवर पूर्ण भरवसा असल्याने त्यांचे मन स्थिर असते.
८
यामुळेच त्यांचे अंतःकरण सुरक्षित असते, ते भयग्रस्त होत नाहीत; शेवटी तेच आपल्या शत्रूंवर विजयान्वित दृष्टी टाकतील.
९
गरजवंतांना ते उदारहस्ते दानधर्म करतात, त्यांची नीतिमत्ता चिरकाळ टिकते; गौरवाने त्यांचे शिंग उंचावले जाईल.
Settings