स्तोत्रसंहिता १०९:२६-३१
२६
हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुमच्या अक्षय प्रीतिनुरुप माझे तारण करा.
२७
हे याहवेह, सर्वांना कळावे की जे काही होत आहे, ते सर्वकाही तुमच्याच हातांनी केले आहे.
२८
त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा; जे माझ्यावर हल्ला करतात, ते लज्जित होवोत, पण मी, तुमचा सेवक मात्र हर्षभरित होवो.
२९
माझे विरोधक एखाद्या वस्त्राप्रमाणे अनादर धारण करोत, आणि लज्जेने ते स्वतःस पांघरूण घेवोत.
३०
परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन, उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन.
३१
कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात, त्यांना मृत्युदंड देणार्यापासून ते त्यांना संरक्षण देतात.
Settings