Skip to content
स्तोत्रसंहिता ११०:१-३

प्रभू अभिषिक्त राजाला उन्नत करतो

स्तोत्रसंहिता ११०:१-३
१
दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत, तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.”
२
याहवेहच सीयोनातून तुझ्या सामर्थ्यवान राजदंडाचा विस्तार करतील व म्हणतील, “तू तुझ्या शत्रूंवर सत्ता गाजव!”
३
तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options