स्तोत्रसंहिता १०८:३-७
३
हे याहवेह, प्रत्येक राष्ट्रात मी तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
४
कारण तुमचे वात्सल्य महान, गगनमंडळाहून उंच आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
५
हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
६
आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा, म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.
७
परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
Settings