स्तोत्रसंहिता १०६:३४-४२
३४
याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही, त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही.
३५
उलट ते अन्य राष्ट्रात मिसळले, आणि त्यांच्या प्रथा आत्मसात केल्या.
३६
त्यांनी त्यांच्या मूर्तींची आराधना केली, त्यामुळे ते पाशात अडकले.
३७
त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या खोट्या दैवतांना अर्पण केले.
३८
निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले, कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली, आणि त्यांचे रक्त सांडून त्यांनी ती भूमी अपवित्र केली.
३९
आपल्याच कर्मानी ते भ्रष्ट झाले; आणि त्यांचे कृत्य व्यभिचारी ठरले.
४०
आणि म्हणून याहवेहचा क्रोध आपल्या लोकांविरुद्ध भडकला आणि त्यांना त्यांच्या वारसांची घृणा आली.
४१
त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले, त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले.
४२
त्यांच्या शत्रूंनी त्यांना चिरडले आणि त्यांच्या शक्ती समोर त्यांना समर्पण करावे लागले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.