Skip to content
स्तोत्रसंहिता १०५:३७-४५

देशात पुरवठा व वतन

स्तोत्रसंहिता १०५:३७-४५
३७
त्यांनी इस्राएलास विपुल चांदी आणि सोन्यासह इजिप्तमधून बाहेर काढले, त्यावेळी त्यांच्या गोत्रातील कोणीही अडखळले नाही.
३८
इस्राएली लोक गेल्यावर इजिप्ती लोकांना आनंद झाला, कारण इस्राएलाच्या भयाने ते ग्रासले होते.
३९
याहवेहनी इस्राएलावर मेघाचे छत्र पसरले, आणि रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभ दिला.
४०
त्यांनी याचना केली, तेव्हा परमेश्वराने लावे पक्षी पाठविले; त्यांना स्वर्गातील भाकर देऊन तृप्त केले.
४१
त्यांनी खडक फोडला आणि पाणी उफाळून बाहेर आले; त्याची नदी होऊन ती वैराण प्रदेशातून वाहू लागली.
४२
कारण आपला सेवक अब्राहाम याला दिलेल्या पवित्र अभिवचनाची त्यांना आठवण होती.
४३
त्यांनी त्यांच्या लोकांना आनंदाची गाणी गात, व आपल्या निवडलेल्यांना हर्षनाद करीत बाहेर आणले;
४४
परमेश्वराने अनेक राष्ट्रांची भूमी यांना दिली, परक्यांनी परिश्रम केलेल्या संपत्तीचे ते वारस झाले—
४५
जेणेकरून इस्राएली लोक त्यांचे विधिनियम व त्यांची आज्ञा दक्षतेने पाळतील. याहवेहची स्तुती असो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options