मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०३:६-१८

प्रभूचा न्याय व विपुल दया

स्तोत्रसंहिता १०३:६-१८
ज्यांच्यावर जुलूम केला गेला, त्या सर्वांना याहवेह धार्मिकतेने व न्यायाने वागवितात.
त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले, आणि आपली अद्भुत कृत्ये इस्राएली लोकात केली:
याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.
ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.
१०
ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत.
११
कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्‍यांवर विपुल आहे.
१२
पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे, तेवढे त्यांनी आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.
१३
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्‍यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
१४
कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात, आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे.
१५
मर्त्यप्राण्याचे जीवन गवताप्रमाणे आहे, ते मैदानावर एखाद्या फुलासारखे फुलतात;
१६
परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते, ते स्थळ त्याचे स्मरण करीत नाही.
१७
परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्‍यांवर अनादि पासून अनंतकालापर्यंत तथा त्यांची नीतिमत्ता त्याच्या पुत्र पौत्रांना लाभते.
१८
जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळण्याची आठवण ठेवतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options