Skip to content
स्तोत्रसंहिता १०३:१-५

हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे

स्तोत्रसंहिता १०३:१-५
दावीदाची रचना माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको.
जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात, जे तुझे सर्व रोग बरे करतात.
जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात; आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात.
जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात; म्हणून गरुडासारखे तुझ्या तारुण्याचे नवीनीकरण होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options