स्तोत्रसंहिता १०३:६-१३
६
ज्यांच्यावर जुलूम केला गेला, त्या सर्वांना याहवेह धार्मिकतेने व न्यायाने वागवितात.
७
त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले, आणि आपली अद्भुत कृत्ये इस्राएली लोकात केली:
८
याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.
९
ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत, व त्यांचा क्रोध सर्वकाळ टिकून ठेवत नाहीत.
१०
ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत.
११
कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्यांवर विपुल आहे.
१२
पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे, तेवढे त्यांनी आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.
१३
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings