Skip to content
स्तोत्रसंहिता १०३:१९-२२

सार्वत्रिक सार्वभौमत्व व विश्वाची स्तुती

स्तोत्रसंहिता १०३:१९-२२
१९
याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे, आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे.
२०
अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो, त्यांची आज्ञा अंमलात आणणारे, व त्यांच्या वचनाचे पालन करणारे, याहवेहचे स्तवन करा.
२१
अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो, त्यांची इच्छापूर्ती करणारे त्यांचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.
२२
त्यांच्या अधिपत्त्यातील अखिल रचनांनो, याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options