मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०२:२३-२८

स्तोत्रकर्ता मर्त्यत्व व देवाच्या सनातनतेचे स्मरण करतो

स्तोत्रसंहिता १०२:२३-२८
२३
माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले; त्यांनी माझे आयुष्य कमी केले.
२४
पण मी त्यांना आरोळी मारली: “हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका; तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात.
२५
प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.
२६
ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; जुनी वस्त्रे टाकून नवी घालावी, तसे तुम्ही त्यांना बदलून टाकाल.
२७
परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.
२८
तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील; तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options