नीतिसूत्रे ६:३२-३५
३२
परंतु जो मनुष्य जारकर्म करतो त्याच्याकडे समज नसते; जो कोणी तसे करतो तो स्वतःचाच नाश करतो.
३३
त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही.
३४
कारण मत्सर नवर्यास संतप्त करतो आणि जेव्हा तो सूड घेतो, तेव्हा तो दयामाया दाखविणार नाही.
३५
तो कोणतीही नुकसान भरपाई स्वीकारणार नाही; कितीही मोठी लाच असली तरी ती तो घेण्यास नकार देईल.
Settings