नीतिसूत्रे ४:१०-१९
१०
माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
११
मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो.
१२
जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत; जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस.
१३
बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस; त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
१४
दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस, किंवा दुष्कृत्ये करणार्यांच्या मार्गाने जाऊ नकोस.
१५
त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस, त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,
१६
कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.
१७
दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.
१८
नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे.
१९
दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे; त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही.
Settings