मुख्य मजकुरावर जा
नीतिसूत्रे २९:१९-२७

वाणी व नातेसंबंधांविषयी व्यावहारिक इशारे

नीतिसूत्रे २९:१९-२७
१९
केवळ शब्दांनी नोकर सुधारू शकत नाहीत; जरी त्यांना समजते, तरी ते प्रतिसाद देणार नाहीत.
२०
बोलण्यास उतावळा अशा कोणाला तुम्ही पाहिले आहे काय? मूर्खाला त्यांच्यापेक्षा अधिक आशा आहे.
२१
ज्या चाकराचा लहानपणापासून लाड होतो, तर मोठेपणी तो उद्धट होईल.
२२
क्रोधिष्ट मनुष्य भांडण सुरू करतो, आणि तापट मनुष्य अनेक पापे करतो.
२३
अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.
२४
चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत; ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत.
२५
मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते.
२६
पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो.
२७
नीतिमान अप्रामाणिक माणसांचा द्वेष करतात; दुष्ट माणसे प्रामाणिक माणसांचा द्वेष करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options