नीतिसूत्रे १८:९-१३
९
जो त्याचे काम करण्यात आळशी आहे, तो विध्वंस करणार्याचा भाऊ आहे.
१०
याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.
११
धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत.
१२
मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
१३
ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे.
Settings