Skip to content
नीतिसूत्रे १४:१-११

ज्ञानी व मूर्ख स्त्री

नीतिसूत्रे १४:१-११
सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते, परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.
जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो.
मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात.
जिथे कुठे बैल नाहीत तेथील गोठा रिकामा राहतो, परंतु बैलाच्या शक्तीने विपुल धान्याचा उपज होतो.
खरा साक्षीदार कधीच फसवणूक करीत नाही, परंतु खोटा साक्षीदार मुखातून असत्य ओततात.
टवाळखोर ज्ञान शोधतो आणि ते त्याला मिळत नाही, परंतु ज्ञान विवेकी मनुष्याकडे सहजपणे येते.
मूर्खापासून दूर राहा; त्यांच्या बोलण्यातून तुला ज्ञान मिळणार नाही.
सुज्ञाची सुज्ञता त्याला योग्य मार्ग दाखविते, पण मूर्खाची मूर्खता धोका आहे.
मूर्खांना पापक्षालन करणे म्हणजे थट्टा वाटते, परंतु नीतिमान लोकांमध्ये सदिच्छा असतात.
१०
प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते; आणि इतर कोणीही त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही.
११
दुष्टांचे घर नाश केले जाईल, परंतु नीतिमानाचा तंबू समृद्ध होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options