Skip to content
नीतिसूत्रे १३:१९-२५

संगतीची शक्ती व वारसा

नीतिसूत्रे १३:१९-२५
१९
अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते, परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात.
२०
सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो, कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते.
२१
अरिष्ट पातक्यांच्या पाठीस लागते, परंतु नीतिमानांना कल्याण हे प्रतिफळ मिळेल.
२२
चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो, परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते.
२३
विना नांगरलेल्या शेतातही गरिबांसाठी धान्य उत्पन्न होते; परंतु अन्याय ते हिरावून नेते.
२४
जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात, परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
२५
नीतिमान मनुष्य जिवाचे समाधान होईपर्यंत खातो, परंतु दुर्जनाचे पोट रिकामेच राहते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options