फिलेमोन १:२१-२५
२१
तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
२२
आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.
२३
ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.
२४
आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.
२५
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासह असो.
Settings