गणना ७:१७-४१
१७
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
१८
दुसर्या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.
१९
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
२०
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
२१
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
२२
पापार्पणासाठी एक बोकड;
२३
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
२४
तिसर्या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले.
२५
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
२६
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
२७
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
२८
पापार्पणासाठी एक बोकड;
२९
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
३०
चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.
३१
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
३२
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
३३
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
३४
पापार्पणासाठी एक बोकड;
३५
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
३६
पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.
३७
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
३८
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
३९
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
४०
पापार्पणासाठी एक बोकड;
४१

Settings