Skip to content
गणना २६:६३-६५

देवाच्या न्यायाची पूर्तता

गणना २६:६३-६५

देवाच्या न्यायाची पूर्तता

६३
मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.
६४
सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.
६५
कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • 1 करिंथकरांस १०:५

    हे सर्व असूनही, परमेश्वर त्या बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हते; त्यामुळे त्यांची शरीरे अरण्यात विखुरली गेली.
    वचन ६४ मधून
  • 1 करिंथकरांस १०:६

    आता ज्यागोष्टी घडल्या, त्या आपल्याला उदाहरणादाखल आणि आपण त्यांच्याप्रकारे आपली हृदये वाईट गोष्टींवर केंद्रित करू नयेत म्हणून घडल्या.
    वचन ६५ मधून
  • गणना १४:३८

    देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी फक्त नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब हे वाचले.
    वचन ६५ मधून
  • अनुवाद २:१४

    पण कादेश-बरनेआहून निघून जेरेद ओहोळ ओलांडून जाण्यास आम्हाला तब्बल अडतीस वर्षे लागली, कारण याहवेहने घेतलेल्या शपथेमुळे लढाऊ पुरुषांची संपूर्ण पिढी छावणीतून नष्ट झाली होती.
    वचन ६४ मधून
  • अनुवाद २:१५

    त्या सर्वांचा नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून याहवेहचा हात त्यांच्यावर उगारलेला होता.
    वचन ६४ मधून
  • रोमकरांस ११:२२

    परमेश्वराचा दयाळूपणा आणि कठोरपणा लक्षात घ्या: जे पडले त्यांच्याशी कठोरपणा, पण तुमच्यासाठी दयाळूपणा. पण तुम्ही त्यांच्या दयाळूपणात राहिले पाहिजे; नाही तर तुम्हालाही छाटून टाकण्यात येईल.
    वचन ६५ मधून
  • इब्री ३:१७

    आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली?
    वचन ६४ मधून
  • इब्री ३:१८

    ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले, ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यांना नाही तर कोणाला बोलत होते?
    वचन ६५ मधून
  • अनुवाद ४:३

    बआल—पौर येथे याहवेहने काय केले हे तुम्ही आपल्या डोळ्याने पाहिले आहे. याहवेह तुमच्या परमेश्वराने बआल-पौराच्या मागे चालणार्‍या सर्वांचा नाश केला,
    वचन ६४ मधून
  • अनुवाद ४:४

    पण याहवेह तुमच्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही सर्वजण आजही जिवंत आहात.
    वचन ६४ मधून
  • गणना १:१

    इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:
    वचन ६४ मधून
  • गणना १:२

    “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.
    वचन ६४ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options