Skip to content
गणना २६:५७-६२

लेव्यांची जनगणना

गणना २६:५७-६२
५७
ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ.
५८
ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता;
५९
अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.
६०
अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.
६१
परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.
६२
एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options