गणना २१:२५-२८
२५
याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली.
२६
हेशबोन हे अमोर्यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.
२७
म्हणूनच कवी म्हणतात: “हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या; सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या.
२८
“हेशबोनमधून अग्नी निघाला, सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली. त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातील नागरिकांना भस्म केले आहे.
Settings