Skip to content
गणना २१:१०-२०

इस्राएलचा प्रवास पुढे चालू राहतो

गणना २१:१०-२०
१०
इस्राएली लोक प्रवास करीत पुढे निघाले आणि ओबोथ येथे तिथे त्यांनी तळ दिला.
११
नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला.
१२
तिथून निघून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला.
१३
नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे.
१४
यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे: “…सूफाहतील वाहेब व आर्णोनाचे ओहोळ
१५
आणि ओहोळांचा जो ओघ आर येथील वस्तीकडे वाहतो आणि मोआब प्रदेशालगत आहे.”
१६
तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”
१७
मग इस्राएलने हे गीत गाईले: “हे विहिरी, उफाळून ये! त्याविषयी गा,
१८
जी विहीर राजपुत्रांनी खोदली, की ज्यामध्ये लोकांचे सरदार— आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.” मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले,
१९
मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास,
२०
आणि बामोथपासून मोआबामधील खोर्‍यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options