गणना २१:३३-३५
३३
नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले.
३४
याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”
३५
तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.
Settings