Skip to content
गणना १०:२९-३२

मोशे होबाबाला मार्गदर्शक म्हणून येण्याची विनंती करतो

गणना १०:२९-३२
२९
आणि मोशेचा सासरा मिद्यानी रऊएलचा पुत्र होबाबला मोशे म्हणाला, “आम्ही त्या ठिकाणाकडे जात आहोत, ज्याविषयी याहवेहने सांगितले की, ‘मी ते तुम्हाला देईन.’ तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुला चांगली वागणूक देऊ, कारण याहवेहने इस्राएली लोकांना उत्तम गोष्टींविषयी अभिवचन दिले आहे.”
३०
तो त्याला म्हणाला, “नाही, मी येणार नाही; मी माझा देश आणि माझ्या लोकांकडे जात आहे.”
३१
पण मोशे म्हणाला, “कृपा करून आम्हाला सोडू नकोस. रानात आम्ही कुठे तळ द्यावा याविषयी तुला माहिती आहे, आम्ही तुझ्या नजरेने पाहू.
३२
तू जर आमच्याबरोबर आलास, तर याहवेह आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी देतील, त्यात तुलाही वाटा मिळेल.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options