गणना १:२६-५०
२६
यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
२७
यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.
२८
इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
२९
इस्साखार गोत्रांची संख्या 54,400.
३०
जबुलूनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
३१
जबुलून गोत्रांची संख्या 57,400.
३२
योसेफाच्या पुत्रांमधून: एफ्राईमच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
३३
एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500.
३४
मनश्शेहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
३५
मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती.
३६
बिन्यामीनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
३७
बिन्यामीन गोत्रांची संख्या 35,400 होती.
३८
दानच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
३९
दान गोत्रांची संख्या 62,700 होती.
४०
आशेरच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
४१
आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती.
४२
नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
४३
नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.
४४
मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्यांनी मोजलेले पुरुष ते हेच.
४५
सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
४६
एकूण संख्या 6,03,550 होती.
४७
परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.
४८
याहवेहने मोशेला सांगितले होते:
४९
“लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.
५०
परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.
Settings