Skip to content
नहेम्याह १३:४-९

नहेम्याह तोबीयाहला हाकलून देतो

नहेम्याह १३:४-९
४
ही घटना घडण्यापूर्वी, एल्याशीब याजकाला परमेश्वराच्या भवनातील कोठड्यांचा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तो तोबीयाहाचा एक स्नेही होता.
५
त्याने तोबीयाहाला एका कोठडी दिली. ही कोठडी पूर्वी धान्यार्पण, ऊद, मंदिराचे सामान, तसेच धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांच्या दशांशांचे साठे ठेवण्यासाठी वापरली जात असे. ही सर्व अर्पणे लेव्यांसाठी, संगीतकारांच्या सभासदांसाठी आणि द्वारपालांसाठी, त्याचबरोबर याजकांसाठी वर्गणी म्हणून असत.
६
हे सर्वकाही होत असताना, मी यरुशलेमात नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीच्या बत्तिसाव्या वर्षी मी त्याच्याकडे परतलो होतो. काही काळानंतर मी त्याला परवानगी मागितली,
७
आणि मी यरुशलेमला परत आलो. तेव्हा मला एल्याशीबाने तोबीयाहास परमेश्वराच्या मंदिरातील अंगणात एका कोठार देण्याचे गैरकृत्य केल्याचे कळले.
८
मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या.
९
नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.