Skip to content
नहेम्याह १३:१-३

नहेम्याह १३:१-३

त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये,
कारण त्यांनी इस्राएली लोकांना अन्न व पाण्याचा पुरवठा केला नाही. उलट त्यांनी त्यांना शाप देण्यासाठी बलामाला पैसे देऊन बोलाविले. (पण परमेश्वराने त्या शापाचे रूपांतर आशीर्वादात केले ही गोष्ट वेगळी.)
जेव्हा लोकांनी नियमशास्त्रातील हे वचन ऐकले, तेव्हा त्यांनी सर्व विदेशी वंशजांच्या लोकांना इस्राएलमधून वगळले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options