नहेम्याह ११:४-९
४
पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र, तो अमर्याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;
५
मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता.
६
पेरेसाचे जे वंशज यरुशलेममध्ये राहत होते ते सर्व 468 वीरपुरुष होते.
७
बिन्यामीनच्या गोत्रातील: सल्लू, हा मशुल्लामाचा पुत्र, तो योएदाचा पुत्र, तो पदायाहचा पुत्र, तो कोलायाहचा पुत्र, तो मासेयाहचा पुत्र, तो इथिएलाचा पुत्र, तो यशायाहचा पुत्र होता.
८
आणि त्याला अनुसरणारे, गब्बई व सल्लाइ 928 पुरुष.
९
जिक्रीचा पुत्र योएल व हस्सनूआहाचा पुत्र यहूदाह हे शहराच्या नव्या भागावर त्यांचे प्रमुख होते.
Settings