Skip to content
नहेम्याह १:४

नहेम्याह १:४

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
हखल्याहचा पुत्र नहेम्याहची वचने: विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात असताना,
माझ्या यहूदी बांधवांपैकी हनानी नावाचा एक बंधू मला भेटण्यासाठी काही लोकांना बरोबर घेऊन यहूदीयाहून आला. बंदिवासातील अवशिष्ट यहूदाहचे व यरुशलेमचे कसे काय चालले आहे याची मी चौकशी केली.
त्यांनी उत्तर दिले, “जे बंदिवासातील उरलेले बंधू आहेत व त्या प्रदेशात राहू लागले आहेत, ते फारच कष्टात व निंदनीय परिस्थितीत आहेत. यरुशलेमचा तट पडलेल्याच अवस्थेत आहे आणि त्याच्या वेशी जाळून टाकलेल्या आहेत.”
हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो.
मग मी म्हणालो: “हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता,
तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो.
आम्ही तुमच्याविरुद्ध दुष्टतेचे आचरण केले आहे. तुम्ही तुमचा सेवक मोशेद्वारे आम्हाला दिलेल्या आज्ञा, नियम व आदेश पाळले नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options