मुख्य मजकुरावर जा
नहूम १:१२-१५

यहूदासाठी सुटका व पुनर्स्थापना

नहूम १:१२-१५
१२
याहवेह असे म्हणतात: “यद्यपि त्यांना अनेक दोस्त राष्ट्र आहेत व ते असंख्य आहेत, तरी ते नष्ट होतील व त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल. हे यहूदाह, मी जरी तुला पीडित केले, तरी आता मी तुला पीडा देणार नाही.
१३
आता मी तुमच्या मानेवरील जू मोडून टाकीन आणि तुमच्या शृंखला तोडून टाकीन.”
१४
हे निनवेह, याहवेहने तुझ्याविषयी आज्ञा दिली आहे: “तुझे नाव पुढे चालविणारी कोणीही संतती राहणार नाही. आणि जी तुझ्या दैवताच्या मंदिरात आहेत ती तुझी दैवते आणि मूर्ती मी नष्ट करेन. मी तुझी कबर तयार करेन, कारण तू तिरस्करणीय आहेस.”
१५
पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत, ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत, जे शांतीची घोषणा करतात! हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर, आणि तुझे नवस फेड. कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत; त्यांचा कायमचा उच्छेद होईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options