मत्तय २४:९-१४
९
“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
१०
त्यावेळी पुष्कळजण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील.
११
अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील.
१२
दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.
१३
परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल.
१४
सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.
Settings