Skip to content
मत्तय १९:१३-१८

मत्तय १९:१३-१८

१३
येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे व प्रार्थना करावी म्हणून लोक आपल्या लहान बालकांना येशूंकडे घेऊन आले. परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले.
१४
येशू शिष्यांना म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका; कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे.”
१५
त्या ठिकाणाहून निघण्यापूर्वी येशूंनी त्यांच्यावर हात ठेवले.
१६
आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”
१७
तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्‍या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”
१८
“कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले. येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options