Skip to content
मत्तय १७:२२-२७

मत्तय १७:२२-२७

२२
ते गालीलात एकत्र आले असताना, येशूंनी शिष्यांना सांगितले, “मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती दिले जाईल.
२३
ते त्याला जिवे मारतील. पण तिसर्‍या दिवशी तो पुन्हा जिवंत केला जाईल.” हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व्यापून गेली.
२४
येशू व त्यांचे शिष्य कफर्णहूमात आल्यानंतर, दोन द्राह्मा मंदिर कर वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरुजी मंदिराचा कर भरीत नसतात काय?”
२५
“अर्थात् ते कर भरीत असतात,” पेत्राने उत्तर दिले. मग पेत्र घरात गेला, तेव्हा तो काही बोलण्या आधी येशूंनी त्याला विचारले, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीचे राजे कर कसे गोळा करतात; स्वतःच्या लेकरांकडून की इतर लोकांकडून?”
२६
“इतर लोकांकडून,” पेत्राने उत्तर दिले. “लेकरे कर भरण्यापासून मुक्त आहेत.” तेव्हा येशू म्हणाले
२७
“पण आपण अडखळण होऊ नये, म्हणून सरोवराच्या किनार्‍यावर जा व तुझा गळ टाक आणि प्रथम जो मासा धरशील त्या माशाचे तोंड उघड आणि त्यात तुला चार द्राह्माचे नाणे मिळेल. ते घे आणि माझ्यासाठी व तुझ्यासाठी कर भर.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options