मत्तय १०:५-८
५
येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका.
६
इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
७
जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा.
८
आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या.
Settings