Skip to content
मार्क १५:१-५

मार्क १५:१-५

प्रातःकाळ झाल्यावर सर्व महायाजक आणि लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि पूर्ण न्यायसभा यांनी योजना केली. सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता तसेच.”
प्रमुख याजक आणि यहूदी पुढार्‍यांनी येशूंवर अनेक आरोप केले.
म्हणून पिलाताने येशूंना विचारले, “तू त्यांना उत्तर देणार नाहीस काय? ते तुझ्यावर कितीतरी गोष्टींचा दोषारोप करीत आहे.”
परंतु येशूंनी काही उत्तर दिले नाही. याचे पिलाताला नवल वाटले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options