मार्क ११:१५-१८
१५
यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली.
१६
त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारातून विक्रीच्या मालाची नेआण करण्यासही त्यांनी मनाई केली.
१७
येशू त्यांना शिकवीत होते, ते म्हणाले, “असे लिहिले नाही का: माझ्या घराला ‘सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना घर म्हणतील,’ परंतु तुम्ही ती ‘लुटारूंची गुहा केली आहे.’ ”
१८
येशूंनी काय केले, हे प्रमुख याजकवर्ग आणि इतर नियमशास्त्र शिक्षकांनी ऐकले, तेव्हा त्यांना कसे ठार मारता येईल याचा मार्ग ते शोधू लागले. त्यांना येशूंची भीती वाटत होती. कारण त्यांच्या शिक्षणामुळे सर्व समुदाय आश्चर्यचकित झाला होता.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings