Skip to content
लूक ५:१७-२६

लूक ५:१७-२६

१७
एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते.
१८
काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला खाटेवर घेऊन त्याला घरात येशूंच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला.
१९
जेव्हा गर्दी असल्यामुळे ते मार्ग काढू शकले नाहीत, म्हणून ते छतावर चढले आणि घराच्या कौलातून त्यांनी त्याला अंथरुणासहित येशूंच्या पुढे गर्दीमध्ये खाली सोडले.
२०
जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते म्हणाले, “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
२१
यावेळी परूशी व नियमशास्त्र शिक्षक आपसात विचार करू लागले, “दुर्भाषण करणारा हा कोण आहे? परमेश्वराशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?”
२२
ते काय विचार करीत होते हे येशूंनी ओळखले आणि त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये या गोष्टींचा विचार का करता?
२३
यातून कोणते म्हणणे सोपे आहे ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’
२४
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”
२५
त्याचवेळी तो त्यांच्यासमोर उभा राहिला आणि ज्या बिछान्यावर तो झोपत असे, ते घेऊन परमेश्वराची स्तुती करीत घरी गेला.
२६
सर्व लोक चकित झाले आणि त्यांनी परमेश्वराची स्तुती केली. तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले व म्हणाले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options