Skip to content
लूक ३:१५-२०

योहान मशीहाकडे निर्देश करतो

लूक ३:१५-२०
१५
लोक अपेक्षेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मनात आश्चर्य करीत होते की कदाचित योहानच ख्रिस्त असले पाहिजे.
१६
योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु जे माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत ते येतील, त्यांचा गुलाम होऊन त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडण्याचीही माझी योग्यता नाही. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.
१७
खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”
१८
दुसर्‍या अनेक शब्दांनी योहानाने लोकांना बोध केला आणि जाहीरपणे शुभवार्ता सांगितली.
१९
योहानाने मांडलिक हेरोदाला दोष दिला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी विवाह केला आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्या,
२०
या सर्वांमध्ये हेरोदाने आणखी भर घातली: त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options