Skip to content
लूक २४:१६-३१

लूक २४:१६-३१

१६
परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते.
१७
येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले.
१८
त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?”
१९
“कशा घटना?” येशूंनी विचारले. ते म्हणाले, “नासरेथ या गावातून आलेल्या येशूंविषयी, जो परमेश्वराच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने उक्ती व कृती यामध्ये सामर्थ्यशाली असा संदेष्टा होता.
२०
महायाजकांनी आणि आमच्या अधिकार्‍यांनी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली, त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले.
२१
परंतु आम्हाला आशा होती की तोच इस्राएलास मुक्ती देणारा होता. या सर्वगोष्टी घडून आज तीन दिवस झाले आहेत.
२२
पण आमच्यातील काही स्त्रियांनी आम्हाला आश्चर्याचा मोठाच धक्का दिला आहे. त्या अगदी आज पहाटे कबरेकडे गेल्या.
२३
पण त्यांना त्यांचे शरीर सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की त्यांना देवदूतांचे दर्शन झाले व ते म्हणाले की येशू जिवंत आहेत.
२४
तेव्हा आमच्यातील काही लोक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी जसे सांगितले होते तसेच त्यांना दिसले. परंतु येशूंचे शरीर त्यांना दिसले नाही.”
२५
तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही मूर्ख आहात आणि संदेष्ट्यांनी जे लिहिले आहे त्यावर विश्वास ठेवण्यास मतिमंद आहात.
२६
आपल्या गौरवात जाण्यापूर्वी या गोष्टी ख्रिस्ताने सहन करणे गरजेचे आहे असे नाही काय?”
२७
नंतर त्यांनी संपूर्ण धर्मशास्त्रातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले.
२८
जेव्हा ते त्या गावाजवळ आले जिथे ते जात होते, तेव्हा येशूंनी पुढे जाणे चालू ठेवले, जसे की ते पुढे जात होते असे दर्शविले.
२९
परंतु त्यांनी त्यांना आग्रह करून म्हटले, “आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली आहे.” तेव्हा येशू त्यांच्या घरी गेले.
३०
ते भोजनास बसले असताना, येशूंनी भाकर घेतली, आभार मानले, ती मोडली आणि ती त्यांना दिली.
३१
तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांना ओळखले. त्याच क्षणाला येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावले.

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • यशायाह ७:१४

    म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
    वचन २७ मधून
  • लूक २४:४४

    मग येशू त्यांना म्हणाले, “मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रसंहितेमध्ये जे काही माझ्याविषयी लिहिले आहे ते सर्व खरे झालेच पाहिजे, हे मी तुम्हाला तुमच्याबरोबर असताना सांगितले होते.”
    वचन २६ मधून
  • यशायाह ५३:१

    आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?
    वचन २६ मधून
  • यशायाह ५३:१२

    म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन, आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले, आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली. त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला, आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.
    वचन २६ मधून
  • अनुवाद १८:१५

    याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे.
    वचन २७ मधून
  • यिर्मयाह ३३:१४

    “ ‘असे दिवस येतील, जेव्हा इस्राएल व यहूदीयाला दिलेले अभिवचन मी पूर्ण करेन, याहवेह जाहीर करतात.
    वचन २७ मधून
  • यिर्मयाह ३३:१५

    “ ‘त्या दिवसात व त्या समयी मी दावीदाच्या वंशातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन; आणि तो या राष्ट्रात न्यायाने व नीतीने कार्य करेल.
    वचन २७ मधून
  • जखऱ्याह ९:९

    सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
    वचन २७ मधून
  • प्रेषित १०:४३

    सर्व संदेष्ट्यांनी येशूंबद्दल अशी साक्ष दिली आहे की जो प्रत्येकजण त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्यांच्या नावाने पापक्षमा मिळते.”
    वचन २७ मधून
  • योहान १:४५

    मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, “ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत.”
    वचन २७ मधून
  • योहान ५:३९

    तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात;
    वचन २७ मधून
  • मत्तय २१:११

    “हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.”
    वचन १९ मधून

हे कोठे घडते

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options