लूक १४:१-६
१
एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते.
२
तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता.
३
परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?”
४
परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले.
५
नंतर ते म्हणाले, “जर तुमचे लहान लेकरू किंवा बैल शब्बाथ दिवशी विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही का?”
६
पण ते काहीच बोलले नाही.
Settings